फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

महिला आणि मुलींवरील अत्याचाराविरोधात मूक मोर्चा

महिला आणि मुलींवरील अत्याचाराविरोधात मूक मोर्चा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : बदलापूर येथे दोन लहान चिमुकल्यांवर झालेला अत्याचार, कोलकता येथील निवासी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार, उरण येथे घडलेल्या हत्याकांडाविरोधात संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर मूक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने निषेधाची स्वाक्षरी अभियान आंदोलन राबविण्यात आले. ‘अकार्यक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणले, “अकार्यक्षम गृहमंत्री हे पक्ष फोडण्यामध्ये, घर फोडण्यामध्ये तसेच संपूर्ण वेळ प्रचारामध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांना गांभीर्य उरलेले दिसून येत नाही. राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाला संपूर्ण वेळ सरकारी खर्चावर चाललेल्या प्रचारासाठी सत्तेतील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम दिले आहे. या सगळ्या प्रकरणांची दखल घेत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.’

यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर मूक मोर्चा आंदोलनात यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, गणेश भोंडवे, सुलक्षणा शिलवंत धर, प्रियंका बारसे, विनायक रणसुभे, नंदकुमार शिंदे तसेच डॉक्टर अभय तांबिले, संतोष कवडे, प्रशांत सपकाळ, कविता कोंडे, अनिल भोसले, संदीप चव्हाण, गणेश काळे, सागर चिंचवडे, संजय पडवळ , धम्मराज साळवे, श्रीमंत जगताप , हेमंत बलकवडे, वंदना आराख, मनीषा शेळके , मोहम्मद सय्यद, लता सूर्यवंशी, राजेश रोजचीरामणी, सचिन गायकवाड, गणेश भांडवलकर, काशिनाथ जगताप आदी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"