फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी

शेअर मार्केटच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

शेअर मार्केटच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आमिष दाखवून कंत्राटदाराची सात लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पाच मार्च ते चार जुलै या कालावधीत सांगवी परिसरात घडली.

याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल हेमराजनी, मितेश जैन, सियालिया पांडे, इमली आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन केले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर परतावा मिळवला असल्याचे स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर केले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना एक लिंक पाठवून एक एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून गुंतवणुकीच्या बहाण्याने सात लाख ६१ हजार ८६४ रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"