फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

सलग सुट्ट्यांमुळे १८ विशेष रेल्वे

सलग सुट्ट्यांमुळे १८ विशेष रेल्वे

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिन, शनिवार – रविवार आणि सोमवारी येणारी राखी पौर्णिमा अशी सलग सुट्टी आल्याने मुंबईतून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. रेल्वे गाड्यांना अपेक्षित गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे १८ विशेष रेल्वेगाड्या चालविणार आहे. या रेल्वेगाड्या एलटीटी – नागपूर, एलटीटी – मडगाव, सीएसएमटी – कोल्हापूर, पुणे – नागपूर आणि कलबुर्गी – बंगळुरू यादरम्यान धावतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विशेषच्या २ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१४१७ विशेष गाडी २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१८ विशेष गाडी १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता कोल्हापूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज हे थांबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेषच्या २ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०२१३९ वातानुकूलित अतिजलद विशेष १५ ऑगस्ट रोजी एलटीटी येथून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४० वातानुकूलित अतिजलद विशेष १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे असतील.

एलटीटी – मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११६७ विशेष रेल्वेगाडी एलटीटी येथून १५, १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६८ विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून १६, १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर (०११६८ साठी), खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड (०११६८ साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे (०११६८ साठी), राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (०११६८ साठी), आणि कणकवली असे थांबे असतील.तसेच पुणे – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या आणि कलबुर्गी – बंगळुरू विशेष रेल्वेगाडीच्या ६ फेऱ्या धावतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"