नेपाळमध्ये विमान कोसळून १८ जणांचा मृत्यू

नेपाळ : नेपाळमधील त्रिभुवन विमानतळावरून बुधवारी (२४ जुलै) सकाळी अकराच्या सुमारास उड्डाण केलेले विमान काही क्षणातच कोसळले आणि यात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. कोसळलेले 9N-AME हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते.
सूर्या एअरलाइन्सचे विमान बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काठमांडू येथून पोखराला जात होते. दरम्यान विमान त्रिभुवन विमानतळावर उतरले. तिथून उड्डाण करत असताना काही क्षणातच विमान कोसळले. यावेळी विमानात सूर्य एरलाईन्सचे १७ कर्मचारी आणि दोन क्रू मेंबर होते. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. ही आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली. अपघात नेमका कशामुळे घडला, याचे कारण अद्याप समोर आले नाही. १९ जणांपैकी १८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर विमानाचे पायलट कॅप्टन मनीष शाक्य हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.