फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

गल्ली दादांचे प्रमाण वाढते!

गल्ली दादांचे प्रमाण वाढते!

चिंचवड आणि पुणे शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. गल्ली दादांचे प्रमाण शहरांमध्ये वाढत आहे. युवकांनाही गुन्हेगारीची क्रेझ आहे. त्यामुळे कुटुंब नागरिकांची चिंता वाढली आहे.

वाहनांची तोडफोड करणे तसेच रस्त्यामध्ये आढळून मारहाण करणे, किरकोळ कारणावरून वादविवाद होणे असे प्रकार शहरांमध्ये वाढले आहे. गृहनिर्माण सोसायटी मधील वाहने पेटवून देणे अशा घटनाही घडल्या आहेत. गेल्या दहाबारा दिवसांत शहरात खुनाच्या घटना घडल्या. एका घटनेत प्राणघातक हल्ला झाला. दोन दिवसांपूर्वी दोन गटांत वाद होऊन गोळीबाराची घटना घडली. एका युवकाचा मृतदेह आढळून आला.

पोलीस ऍक्शन मोडवर!

शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी शहर पोलिसांनी अवैध धंद्यावर हातोडा मारण्याचे सत्र सुरू केले आहे. तरी सोशल मीडिया, चित्रपटांतील गुंड तसेच गुंड टोळ्यांचे उदात्तीकरण यामुळे युवकांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारीची क्रेझ आणि त्यामुळे युवकांकडून घडत असलेले गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान नाशिक शहर पोलिसांसमोर आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी हे करावेत प्रयत्न!

युवक वर्गात गुन्हेगारीची क्रेझ आहे. शाळा, कॉलेज, वस्त्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिसांकडून समुपदेशन वर्ग सुरू केल्यास शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात येऊ शकते. पोलीस आणि सेवाभावी संस्था यांनी एकत्रितपणे काम करून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"