फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र राजकारण

निकृष्ट रस्ता? कारवाई होणार!

निकृष्ट रस्ता? कारवाई होणार!

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची देयके काढून केलेल्या गैरव्यवहारातील दोषी ठेकेदारकडून वसुली केली जाईल. दोषी ठेकेदार, महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्विकृत निविदा दराच्या ४० टक्के पेक्षा कमी दराने स्वीकृत करण्यात आलेल्या निविदा पैकी १५ रस्त्यांच्या कामांचे गुणवत्ता व दर्जा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे ह्या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येऊन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांनी दिलेले अहवालामध्ये काही रस्त्यांची गुणवत्तामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार अश्विनी जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जानेवारी २०२२-२३ मधील कोट्यवधी रुपयाच्या डांबरी व सिमेंट काँक्रीट करण्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या ४४ तक्रारी प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले होते. या रस्त्यांच्या कामाच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी करणेबाबत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्यामार्फत करून सदर कामातील दोषी ठेकेदार व निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करणारे संपूर्ण देयेके देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

महापालिकेतील रस्त्याच्या कामांमध्ये मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला सदर कार्यवाहीने लगाम लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेतील अधिकारी राजकीय दबाव झिडकारून करदात्या नागरिकांच्या पैशातून शहरात विकास कामे करताना महापालिकेचे हित जोपासण्याचे काम करतील , अशी अपेक्षा आमदार जगताप यांनी व्यक्त केली आहे.

या रस्त्यांची कामांची ठेकेदारांकडून दुरुस्ती व रक्कम वसूल करून याबाबत सीओईपीने दिलेल्या अहवालातील शिफारशी नुसार निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामे केलेल्या दोषी ठेकेदारांकडून रकमेची वसुली व संबंधित रस्त्यांच्या कामावर देखभाल करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासित केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"