Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी हत्यारासह जेरबंद!

विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी हत्यारासह जेरबंद!

5 लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 6 गुन्हे उघड
पिंपरी : विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट (तीन) ने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 5 लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आळंदी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघड झाले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

vcc navratri
vcc navratri

याप्रकरणी सभाजीत मुरलीधर गौतम जैस्वार (वय 45, रा. भदकीन, ता.मडी याहू, जि जैनपुर, उत्तर प्रदेश), विनोद हरिराम जैस्वार वय 40, रा. जेगापूर, ता. मडीयाहू, जि. जैनपुर, उत्तर प्रदेश), मनीष महेंद्र प्रसाद (वय 38, रा. भदखीन, ता. मडीयाहू, जि. जैनपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार जुल्फकार खान (रा मंतरवाडी, उंड्री) (पाहिजे आरोपी) याच्या मदतीने आळंदी, मरकळ, पिंपळगाव, सोळू या परिसरात गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा चोरी करणारे व्यक्ती या मरकळ, पिंपळगाव परिसरात आल्या आहेत अशी माहिती मिळाली होती. मरकळ पिंपळगाव परिसरात पोलिसांनी जाऊन सदर व्यक्तींचा शोध घेतला असता तीन संशयित व्यक्ती हे दुचाकी मोटरसायकल वरून डीपी चोरीच्या हत्यारासह जात असताना ताब्यात घेण्यात आले. गुन्हा करतेवेळी लागणारे साहित्य व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आळंदी पोलीस ठाण्यात याबाबत सहा गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. सुदर्शन राठोड यांच्या सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट तीनचे संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, पोलिस अंमलदार युवराज बिराजदार, सोमनाथ बोऱ्हाडे, बाळासाहेब खेडकर, दिलीप राठोड, स्वप्निल महाले, अजित रुपनवर यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"