चार वर्षांपासून फरार असलेला मोका आरोपी जेरबंद!

पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट 4 ची कामगिरी
पिंपरी : गंभीर गुन्ह्याततील आरोपी गेल्या चार वर्षापासून फरार होता. गुन्हे शाखा युनिट चारने या आरोपीस जेरबंद केले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

नारायण सोपान दाभाडे (वय 41, रा. जांभुळगाव, व्हिजन सिटी, फ्लॅट नंबर 304 ,ता. मावळ ) हा आरोपी गेली चार वर्ष फरार होता. या आरोपीवर यापूर्वी मोका, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी, किडनॅपिंग, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर, ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा कट, गांजा विक्री असे एकूण 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीची तळेगाव दाभाडे परिसरात मोठी दहशत आहे.

वरिष्ठांनी सध्या फरार आरोपी शोधण्याची मोहीम सुरू केलेली आहे . सदर आरोपीवर गंभीर गुन्हे असल्यामुळे चार वर्षांपासून फरार असलेल्या नारायण दाभाडे याचा तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करून गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून आरोपीस जांभुळगाव येथून तपास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाई करिता उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे येथे आरोपीस हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे (1) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस अंमलदार असवले, सोनटक्के, मुंडे यांनी केली. चार वर्षांपासून फरार असलेला मोका आरोपी जेरबंद! पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट 4 ची कामगिरी

