ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका!

सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त
पणजी : नाटसम्राट नाना पाटेकर यांचे आज गुरुवार 18 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावला मधील राहत्या घरी नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांना उपचारासाठी येथील मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉक्टर शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवण्यात यश आले नाही. गोव्यातील मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नाना पाटेकर यांना पहाटे 5.20 वाजता मृत घोषित केले. छातीत तीव्र वेदना होत असल्याने एका फ्लॅटवर वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते. तिथे ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांना कार्डियाक मसाज देऊन रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय पथकाने पहाटे पाच वाजून वीस वाजता त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण मेडिको लीगल (वैद्यकीय कायदेशीर) स्वरूपाचे असल्याने त्यांचे सर्व विच्छेदन केले जाईल.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर मराठी सिनेमा सृष्टीतील दिग्गज नाव. नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथे झाला. वयाच्या तेराव्या वर्षापासून ते काम करत आहेत. त्यांचा खडतर प्रवास सोपा नव्हता. त्यांनी आपला साधेपणा आणि मातीशी जोडलेली नाळ कधीच तोडली नाही. नाना पाटेकर हे केवळ दिग्गज अभिनेतेच नव्हते, तर सामाजिक भान जपणारे अभिनेते होते. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर 2015 मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर नाम फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. पाटेकर यांच्या वडिलांचे नाव गजानन पाटेकर आणि आईचे नाव निर्मला पाटेकर असे होते. मुलगा मत्हार हा देखील सिनेमा सृष्टीत सक्रीय आहे.

नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली असून सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. ‘पुरुष’ नाटकामध्ये त्यांनी साकारलेला गुलाबराव आणि ‘हमिदाबाईची कोठी’ नाटकात साकारलेला सत्तार अजरामर केला आहे. त्यानंतर हिंदी चित्रपट सुट्टीत प्रवेश करत 1978 मध्ये आलेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढील काही वर्षात त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका केली.
नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्र नायक अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. नानांचा मराठीत ‘नटसम्राट’ हा सिनेमा विशेष गाजला आहे. ‘अंकुश’ या चित्रपटात नानांनी बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका साकारली. त्यानंतर ‘परिंदा’ सिनेमातील नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. या व्यक्तिरेखेबद्दल त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1992 मध्ये ‘तिरंगा’ सिनेमाद्वारे नानांना प्रमुख भूमिका साकारण्याचा प्रथम मान मिळाला. ‘क्रांतिवीर’, ‘अग्नी साक्षी’, ‘खामोशी’ या चित्रपटांनी त्यांना शिखरावर नेऊन ठेवले. नाना पाटेकर यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2013 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने ही गौरविण्यात आले.
1990 मध्ये इंडियन टेरिटोरियल आर्मी म्हणून कॅप्टन नाना पाटेकर यांनी जॉईन केले होते. द फायनल अटॅक मध्ये मेजर च्या भूमिकेसाठी तीन वर्ष आर्मीची ट्रेनिंग घेतली. 1999 मध्ये कारगिल युद्धा दरम्यान त्यांनी अभिनय करिअर सोडून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये सेवा बजावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे मंत्री आशिष शेलार आमदार रोहित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हसन मुश्रीफ यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

