भावाच्या पोटात चाकू खुपसून केले गंभीर जखमी!

पिंपरी : झोपडपट्टीतील घर सोडून जात असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात स्वतःच्या भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दत्तनगर, माकड गल्ली, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी अंकुश पोपट नलावडे (वय 35, दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश पोपट नलावडे (दत्तनगर, माकड गल्ली, चिंचवड) या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या साथीदाराने झोपडपट्टीत राहून मुले बिघडत असल्याने आम्ही बाहेर जाऊन राहणार असे आरोपी समोर सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी घरासमोरील रस्त्यावर उभे असताना आरोपीने घरातील स्वयंपाक घरातील चाकू आणून फिर्यादीच्या पोटात खूपचला आणि गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

वाकड पोलीस तपास करत आहेत. कारची स्कूटरला धडक!
पिंपरी : भरधाव कारने स्कूटरला समोरून दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवार 26 रात्री एरोमेटी विंड सोसायटीच्या गेट समोर, काळा खडक ते मिलेनियम मॉल रोड वाकड येथे घडली.
याप्रकरणी जेमित राजेश व्यवहारे (वय 35, एरोमेटी विंड सोसायटी, काळा खडक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारचालक अक्षय राजेंद्र पाटील (वय 32, चौधरी पार्क, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आपल्या स्कूटरवरून सोसायटीच्या गेट समोर उभे असताना आरोपीने कार भरधाव आणि निष्काळजीपणाने चालवून स्कूटरला समोरून धडक दिली. या अपघातात फिर्यादी आणि त्यांची सासू रस्त्यावर पडून त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली.

