Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
गुन्हेगारी

डीपी मधील 40 हजार रुपये किंमतीचे तांबे चोरीला!

डीपी मधील 40 हजार रुपये किंमतीचे तांबे चोरीला!

पिंपरी : खराबवाडी गावच्या हद्दीतील मेटलिस्ट कंपनीच्या मालकीच्या सध्या वापरात नसलेल्या खाजगी लाईटच्या डीपीचे 40 हजार रुपये किंमतीचे तांबे चार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवार 27 सप्टेंबर रोजी रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास खराबवाडी ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी दत्तात्रेय प्रल्हाद पाटील (वय 50, सिक्युरिटी गार्ड ,रा. सध्या- वासुली फाटा, लक्ष्मण नामदेव जांभळे यांच्या रूममध्ये वासुली, ता. खेड, मुळगाव- तांडोर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी दक्षिण माहाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराबवाडी गावच्या हद्दीत मेटलिस्ट कंपनीच्या मालकीचे असलेल्या व सध्या वापरात नसलेल्या प्रायव्हेट लाईटचे डीपीचे अंदाजे 100 किलो वजनाचे तांबे किंमत 40 हजार रुपये हे अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्या करता लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक घुले तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

कापडाच्या दुकानाचे शटर उचकटून 17 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरीला!
पिंपरी : ओम साई कापडाच्या दुकानाचे शटर अज्ञात इसमाने उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील सुमारे 17 हजार 700 रुपये किंमतीचा माल चोरून नेला. ही घटना शनिवार 26 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ते 27 सप्टेंबर सकाळी दहा वाजेच्या दरम्यान आळंदी, ता. खेड, वडगाव चौक) या ठिकाणी घडली.

याप्रकरणी बिट्टू कुमार वीरेंद्र महतो (वय 21, रा समृद्धी मंगल कार्यालय पद्मावती रोड, आळंदी, ता. खेड, मूळ- रा. ग्राम हिरोलावा बिशणपुर ,पो. सोनोहूल महोदे, ता. कोआरी मदन, जि. चितामंदी, बिहार) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे आळंदी येथे ओम साई नावाचे कपड्याचे दुकान आहे .या दुकानाचे शटर अज्ञात इसमाने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील नऊ हजार रुपये किंमतीचे जेंट्स फुल बाह्याचे वेगवेगळे रंगाचे 30 शर्ट, साडेसात हजार रुपये किंमतीच्या जेंट्स वेगवेगळ्या रंगाच्या 15 जीन्स पॅन्ट व बाराशे रुपये रोख रक्कम असा एकूण 17 हजार 700 रुपये किंमतीचा माल व रोख रक्कम चोरून नेली. आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"