Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

बहिणीचा गळा दाबून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप!

बहिणीचा गळा दाबून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप!

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
पिंपरी : व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे निराश होऊन सुबोजित बासू यांनीआत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याची बहीण प्रियदर्शनी बासू (वय 23) हिने विरोध केल्याने आरोपीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. उपलब्ध पुरावे व साक्षीदारांचे जबाब विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी सुबोधित बासू यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न एक महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

viara vcc
viara vcc

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 एप्रिल 2010 रोजी अपरिजीता सोसायटी, शिंदे नगर येथे आरोपी सुबोजित बासू याने व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची बहीण प्रियदर्शनी बासू (वय 23) हिने विरोध केला असता आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एस. वंजारी यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्याचा तपास तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. टी. पवार यांनी शास्त्रोक्त पद्धतीने करून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे साक्षीदारांचे जबाब व इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.

indra dairy
indra dairy

या प्रकरणात सरकारी अभियोक्ता श्रीमती लीना पाठक यांनी सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली. तसेच गुन्ह्याचे सुनावणी दरम्यान न्यायालयात अचूक व योग्य साक्ष देण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे सिद्धराम म्हेत्रे यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन केले.

उपलब्ध पुरावे व साक्षीदारांचे जबाब विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी सुबोजीत बासू यास भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त करावास अशी शिक्षा सुनावली. सातत्यपूर्ण न्यायालयीन पाठपुरावा यामुळे तब्बल 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा मिळाली असून स्टार ‘केस’ च्या माध्यमातून हिंजवडी पोलिसांच्या तपासाला यश प्राप्त झाले आहे. सदर केस “दत्तक केस” म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे हिंजवडी पोलीस ठाणे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"