तडीपार गुन्हेगार कोणत्यासह जेरबंद!

पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शस्त्रबंदी असताना कोयता बाळगलेल्या स्थितीत सराईत गुन्हेगार आढळून आला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार 15 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास श्रावण हॉटेलच्या पाठीमागे, सिग्मा कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला, भांबोली, ता. खेड येथे करण्यात आली.

याप्रकरणी संतोष वायकर पोलीस शिपाई, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. आकाश बाळासाहेब शेळके (वय 30, कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी आरोपी आकाश शेळके यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीची मुदत संपली नसताना देखील त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनापरवाना अवैधरित्या प्रवेश केला आहे. याशिवाय आरोपीने श्रावण हॉटेलच्या पाठीमागे, सिग्मा कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला, भांबोली येथे आपल्याजवळ कोयता बाळगलेल्या स्थितीत पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनचे गोरड हे तपास करत आहेत.

