Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

16th September 2026
गुन्हेगारी

मोरवाडीत एमडी ड्रग्जसह दोघांना अटक!

मोरवाडीत एमडी ड्रग्जसह दोघांना अटक!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोरवाडी परिसरात कारवाई करून 8 ग्रॅम 780 मिलिग्रॅम मेफेड्रॉन एमडी जप्त केले. ही कारवाई मोरवाडीतील कापसे उद्यानाजवळ करण्यात आली.

viara vcc
viara vcc

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके यांनी फिर्याद दिली आहे. तानाजी व्यंकटराव कानुरे (वय 42, रा. नवनिर्माण हाउसिंग सोसायटी रुपीनगर, तळवडे आणि एका 38 वर्षीय महिलेला रा.ताम्हाणे वस्ती, चिखली) मुद्देमाला सह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अंमली पदार्थ पुरविणारा मयूर केशव पाडाळे (रा. कामशेत) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कापसे उद्यानाजवळ काहीजण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तानाजी कानोरे आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत आठ ग्रॅम 780 मिलीग्राम एमडी, तीन मोबाईल आणि एक चार चाकी असा एकूण 5 लाख 52 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा एमडी साठा कामशेत येथील मयूर पाडाळे यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे तपासात समोर आले आहे.

मित्राला भेटल्याने मुलीला मारहाण!
पिंपरी : मित्रासोबत बोलते आणि त्याला भेटते या कारणावरून 22 वर्षीय तरुणीला मारहाण करीत तिचा पासपोर्ट, व्हिसा, जपानचे रेसिडेन्शिअल कार्ड आणि मोबाईल ताब्यात घेण्यात आला. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे शनिवार 12 सप्टेंबर रोजी घडला.

याप्रकरणी पीडित 22 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तिच्या आई-वडिलांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी तुकाराम नगर येथील राहत्या घरी तरुणी मित्रासोबत बोलत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वडिलांनी तिला मारहाण केली. तर आईने जपानला जाऊ देणार नाही तसेच करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणीला घराबाहेर काढून तिचा पासपोर्ट, व्हिसा आणि जपानचे रेसिडेन्शियल कार्ड घरात ठेवून घेण्यात आले. पोलीस ठाण्याकडे जात असताना तिचा मोबाईलही घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"