कॉपर वायर व केबल चोरी करणारी टोळी जेरबंद;नऊ गुन्हे उघडकीस!

19 लाख 84 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत; गुन्हे शाखा युनिट (4)ची कारवाई
पिंपरी : तळेगाव एमआयडीसी, चिखली व देहूरोड या भागातून डीपी मधील कॉपर वायर व केबल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखा युनिट चार ने जेरबंद केली आहे. या टोळीकडून 19 लाख 84 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून डीपी मधील कॉपर वायर व केबल चोरीला जात असल्याचे प्रकार वाढल्याने याबाबत गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जात होता. गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम लोणकर व पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.

जयराम विक्रम साळुंखे (वय 29, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी, मूळ- रा. चिंचोली, ता. भूम, जि. धाराशिव), सुरज जालिंदर फड (वय 21, रा. सावतामाळी मंदिराजवळ गुरुद्वार पान शॉपच्या पाठीमागे जाधववाडी, चिखली, मूळ- राजवाडी, ता. माजलगाव, जि. बीड), सचिन जालिंदर फड (वय 26, रा. देवाची आळंदी रोड, संभाजीनगर, साळुंखे होम पहिला मजला, रूम नंबर नऊ, मोशी, मूळ -रा. राजवाडी, ता. माजलगाव, जि. बीड), मोहम्मद रियाज मोहम्मद बशीर सलमानी (रा मोरे पाटील चौक, चिखली, मूळ- नरकटाह, ता. बाशी, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मनोज संतोषी चौधरी (रा. कुदळवाडी, चिखली, मूळ- रा. मु. पो. गालापूर, ता. विटवा, जि. सिद्धार्थनगर ,उत्तर प्रदेश), अनुज कुमार राम क्रिपाल गौतम (रा. कुदळवाडी, मोरे पाटील चौक, चिखली, ता. हवेली, मूळ- रा. ता. विटवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) या आरोपींकडून 18 लाख 74 हजार रुपये किंमतीचे कॉपर, चार चाकी गाडी व आईसर वाहन जप्त केले.
कॉपर बाबत त्यांच्याकडून कसून तपास करण्यात आला असता त्यांनी तळेगाव एमआयडीसी, चिखली भागात वेगवेगळ्या ठिकाणावरून डीपी मधील कॉपरचे वायर व केबल चोरी करून त्यातील काढलेल्या तारा आहेतअसे सांगितले. आरोपींनी सांगितलेल्या चोरीच्या ठिकाणावरून पोलीस पथकाने पोलीस अभिलेख चेक केला असता तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सहा, चिखली पोलीस स्टेशन हद्दीत दोन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा घडला आहे. गुन्हे शाखा पथक चार या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपी निष्पन्न करून कॉपर मुद्देमालासह अजय प्रल्हाद गायकवाड (वय 50, राममाधव नगर, चिखली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. या आरोपी कडे तपास केला असता सदर गुन्ह्यातील मुद्देमाल केबल वायर, दोन ग्राइंडर मशीन, दोन रेग्युलेटर, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1 लाख 10 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 4 अर्जुन घोडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार लोणकर, वायबसे पोलीस हवलदार, मोरे, महाडिक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे, मेरगळ ,वेताळ, खेडकर, सुखदाने, मुंडे, नागरे ,सोनवणे, बाळसराफ, खराडे, माटे, तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस फौजदार माळी, पोलीस हवालदार नानावरे, कारके यांनी केली आहे.

