Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

1st November 2026
गुन्हेगारी

उसने दिलेले 50 हजार रुपये परत मागितल्याने चाकूने वार!

उसने दिलेले 50 हजार रुपये परत मागितल्याने चाकूने वार!

पिंपरी : तीन वर्षांपूर्वी हात उसने दिलेले 50 हजार रुपये परत मागण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीला राग आल्याने त्याने घरातील चाकूने फिर्यादीच्या कपाळावर तसेच पती व मुलगा यांच्या पोटावर वार करून जखमी केले. ही घटना गुरुवार 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गणेश नगर, भगत वस्ती, भोसरी येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. निरंजन रामजन्म प्रसाद (वय 34,), एक महिला (वय 26, दोघेही रा. गणेश नगर, भगत वस्ती, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे पती लहान मुलगा व मोठा मुलगा हे आरोपी निरंजन रामजन्म प्रसाद यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी औषधोपचारासाठी दिलेले हात उसने पन्नास हजार रुपये परत मागण्यासाठी गेले असता त्यांना राग आला. आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून घरातील चाकूने फिर्यादीच्या कपाळावर तसेच त्यांचा पती रामजन्म प्रसाद व मुलगा सुरज प्रसाद यांच्या पोटावर वार करून जखमी केले. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केदारी व साबळे हे तपास करत आहेत.

कंपनीच्या पार्किंग मधून टेम्पो गेला चोरीला!
पिंपरी : टाटा कंपनीचा टाटा एस एस सी टेम्पो कंपनीच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. ही घटना बुधवार 19 व 20 ऑगस्ट रोजी प्रीमियम ट्रान्समिशन, पुणे मुंबई जुना महामार्ग समोरील बाजूस आकुर्डी येथे घडली .

याप्रकरणी गौतम श्रीरंग जकाते (वय 55, आदर्श कॉलनी, वाकड, पोलीस स्टेशन समोर, कलाटे नगर, वाकड )यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा टाटा एस एस सी गोल्ड सीएनजी टेम्पो नंबर( एम एच/ 14/ के ए/ 31 20) हा प्रीमियम ट्रान्समिशन कंपनीच्या पार्किंग मध्ये लॉक करून उभा केला होता. हा टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी व कोल्हे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"