30 हजार रुपये किंमतीचे साहित्य घर मालकाने लांबविले!

पिंपरी : जेष्ठ महिला मुलीकडे राहावयास गेले असताना त्याचा फायदा घेऊन घर मालकाने राहते घराचे कुलूप व दरवाजा तोडून घरामधील 30 हजार रुपये किंमतीचे घरगुती साहित्याची विल्हेवाट लावली. ही घटना 2 फेब्रुवारी 2024 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत भाले चाळ, डॉक्टर बेक कंपनी समोर, गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी 81 वर्षीय ज्येष्ठ महिला नागरिक (रा. भाले चाळ, डॉक्टर बॅक कंपनी समोर ,गांधी नगर, झोपडपट्टी, पिंपरी )यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेश एकनाथ भाले (वय ५०, रा. गोपी चाळ, जुना खडकी बाजार, खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या मुलीकडे कासारवाडी येथे राहावयास गेले असताना त्याचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय राहत्या घराचे कुलूप व दरवाजा तोडून आरोपी घरमालक राजेश एकनाथ भाले यांनी फिर्यादी यांच्या राहत्या घरामध्ये प्रवेश करून तीस हजार रुपये किंमतीचे घरगुती साहित्याची विल्हेवाट लावली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत. ज्येष्ठ महिलेच्या

