Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
गुन्हेगारी

शिवीगाळ केल्याने चिडून लोखंडी सळईने मारहाण; एकाचा खून!

शिवीगाळ केल्याने चिडून लोखंडी सळईने मारहाण; एकाचा खून!

पिंपरी: झोपण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याचा जाब विचारून एका व्यक्तीने चिडून हातातील लोखंडी सळईने डोक्यावर ,तोंडावर, पायावर जोरजोरात चार ते पाच वार करून गंभीर जखमी करून ठार मारले. ही घटना सोमवार 17 ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास गोदी कामगार धर्मशाळा ट्रस्ट आळंदी देवाची, प्रदक्षिणा रोड येथील वृंदावन स्नॅक भोजनालयाच्या समोरील शेड मधील मोकळे जागेत घडली. बाबासाहेब उर्फ राहुल साहेबराव कांबळे (वय 46, जि. बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी दत्तात्रेय शेषराव कांदे (वय 37, रा. कोतवाल गोदी कामगार धर्मशाळा आळंदी देवाची, वृंदावन स्नॅक भोजनाच्या समोरील शेड मधील मोकळ्या जागेत) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनंत दिगंबर तौर (वय 30, रा. शेलगाव दंडी, ता. माजलगाव, जि. बीड )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि खून झालेले बाबासाहेब उर्फ राहुल साहेबराव कांबळे (वय 46, जि. बीड) हे एकत्र काम करीत होते. ते रोज झोपण्यासाठी वृंदावन स्नॅक भोजलाच्या समोरील शेड मधील मोकळ्या जागेत जात असत. मयत आणि आरोपी यांच्यातआदल्या रात्री शिवीगाळ झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी अनंत तौर यांनी दुसऱ्या रात्री राहुल कांबळे याला शिवीगाळ करून जाब विचारला. आणि चिडून हातातील लोखंडी सळई डोक्यावर, तोंडावर, पायावर जोरदार चार ते पाच वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले. आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"