मशिनरी नियोजित ठिकाणी न पोहोचविता दीड लाखाची फसवणूक!

पिंपरी : मशिनरी पोचविण्याचे कंत्राट स्वीकारून भाड्यापोटी एक लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र मशिनरी नियोजित ठिकाणी न पोहोचविता अर्ध्यावरच सोडून देत फसवणूक केल्याप्रकरणी ब्रोकर आणि ट्रकचालका विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हा प्रकार 23 जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत काळभोर नगर आकुर्डी येथे घडला.

याप्रकरणी एका महिला व्यावसायिकाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मोहम्मद जुबेर रा मोहितेवाडी पुणे आणि ट्रक चालक लुकमान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला चाकण येथील एका कंपनीचे कोर्ट चेंबर हाय कास्टिंग मशीन हरियाणा येथे पोहोचविण्याचे कंत्राट मिळाले होते .त्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकाने ब्रोकरमार्फत ट्रक ठरविला .भाड्यापोटी 1 लाख 50 हजार रुपये ब्रोकर आणि चालककर्त्याच्या बँक खात्यावर ऑनलाईन वर्ग करण्यात आले. मात्र आरोपींनी मशनरी नियोजित ठिकाणी न पोचविता अर्ध्यावरच सोडून दिली पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अधिकचा तपास करत आहेत .

