दुकानातील कर्मचाऱ्याने केला 5 लाख 56 हजाराचा अपहार!

पिंपरी : दुकानात विक्रीसाठी ठेवलेले रेडिमेट कपडे मालकांच्या संमतीशिवाय विकून 5 लाख 56 हजार 840 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दुकानातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली . ही घटना मे ते जुलै 2026 या कालावधीत अजमेरा कॉलनी, पिंपरी येथील गोडाऊन मध्ये घडली.

याप्रकरणी रच्चित प्रभू छाबडा (वय 36, रा. इंदूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. रवी शंभूलाल बठालिया (वय 39, रतलांब, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मागील तीन महिन्यांपासून फिर्यादीकडे काम करत होता. त्याने महाराष्ट्रात आपली मोठी ओळख असल्याचे सांगून कापडाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विश्वासाने सोपवण्यात आलेल्या 2760 रेडीमेड कापडापैकी पाच लाख 56 हजार 840 रुपये किंमतीचे 2528 कपडे विकले. विक्रीतून मिळालेली रक्कम फिर्यादीकडे जमा करता स्वतःकडे ठेवून आर्थिक अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संत तुकारासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करत आहेत.
ऑनलाइन आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल!
पिंपरी : स्वतःचे बँक खाते वापरून साथीदाराशी संगणमत करत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे व्यवहार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 डिसेंबर 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र आकुर्डी येथे घडली.
याप्रकरणी सुमित मारुती मोरे यांनी तक्रार दिली आहे. प्रथमेश मधुकर जवरे (वय 21, रा. बिजलीनगर, चिंचवड )आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते उघडून साथीदारांच्या मदतीने ग्रुपचा सभासद म्हणून एक लाख 13 हजार रुपयांचे संशयास्पद व्यवहार केले. तपासात या खात्याचा वापर करून भारतातील दोन नागरिकांची एक लाख 13 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

