Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
महाराष्ट्र

नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरसाठी १७५ कोटींचा निधी: आमदार महेश लांडगे

नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरसाठी १७५ कोटींचा निधी: आमदार महेश लांडगे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा ते खेड उन्नत कॉरिडॉर (Twin Elevated Corridor) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला मोठा दिलासा मिळाला असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील ४.१०४ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSRDC) पत्र पाठविले आहे. या निर्णयामुळे रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

viara vcc
viara vcc

नाशिक फाटा ते खेड उन्नत कॉरिडॉर प्रकल्पासाठी अतिरिक्त १४.१ हेक्टर भूसंपादन आवश्यक असून, यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ३.८६९ हेक्टर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील ६.१२८ हेक्टर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील ४.१०४ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) या भूसंपादनासाठी एकूण ६०० कोटी रुपयांचे मूल्यांकन केले असून, संबंधित यंत्रणांना प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वी मान्यता देण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे भूसंपादनासाठी वितरित करण्यात आलेल्या २०० कोटी रुपयांच्या अखर्चित निधीपैकी १७५ कोटी रुपयांची तरतूद नगरविकास विभागामार्फत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीतील भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे.

आमदार महेश लांडगे यांनी याबाबत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने हा निर्णय घेतल्याने प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भूसंपादनासाठीही निधी लवकरच मंजूर करण्यात येणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"