दोन फरार आरोपीकडून दोन पिस्तुले 15 जिवंत काडतुसे जप्त!

पिंपरी : गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, 15 जिवंत काडतुसे, एक चार चाकी वाहन असा एकूण 11लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल रावेत पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावेत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी विनोद निजप्पा गायकवाड (वय 35, रमाबाईनगर, रावेत) आणि अक्षय प्रभाकर साबळे (रा. काळभोरनगर, आकुर्डी )हे गुन्ह्यानंतर फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. गुप्त माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी जाधववस्ती, रावेत परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.
झडती दरम्यान आरोपीकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, 15 जिवंत काडतूसे आणि वापरातील कार जप्त करण्यात आली. ही कारवाई रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे यांच्या तपास पथकाने केली. आरोपीकडून तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

