Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

प्रेस मशीनचा लोखंडी भाग उडून गळ्यात घुसून तरुणाचा मृत्यू!

प्रेस मशीनचा लोखंडी भाग उडून गळ्यात घुसून तरुणाचा मृत्यू!

पिंपरी : तांत्रिक माहिती नसणाऱ्या हेल्परकडून प्रेस मशीन वर ऑपरेटरचे काम करून घेत असताना मशीनचा लोखंडी भाग उडून गळ्यात घुसला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना बुधवार एक जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास मोशी येथील ए वन स्टॅम्पिंग कंपनीत घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी बुंदेला रामधूज निषाद (वय 23, धावडे वस्ती, भोसरी, मूळ- रा. चित्रकूट उत्तर प्रदेश) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनीचे मालक संदेश प्रभुराव पांडे (वय 52, रा. वडमुखवाडी), सुपरवायझर बाळाजी पंढरीनाथ आलुरे (वय 46, रा. बोराटेवस्ती, मोशी) आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक शिवाजी राळे (वय 28, रा. वडमुखवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत हेल्पर हा बारावी उत्तीर्ण असून त्याला प्रेस मशीन चालवण्याचे कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण नव्हते असे असतानाही आरोपींनी त्याच्याकडून मशीनवर जॉब ऑपरेटर चे काम करून घेतले. काम सुरू असताना मशीनचा लोखंडी जॉब उडून त्याच्या गळ्यात लागला. गंभीर दुखापत झाल्याने त्याला जागीच मृत्यू आला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"