Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

वाकड व बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याने दोघे जेरबंद!

वाकड व बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याने दोघे जेरबंद!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करून वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताथवडे व बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुसगाव ता. मुळशी येथे वेगवेगळ्या ठिकाणी देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगल्याने दोघा व्यक्तींना जेरबंद करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

डांगे चौक ओवर ब्रिज रोडच्या कडेला सोमवार 29 जून रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मनोज कुमार जोखीराम पाल (वय 26, रा. लोंढे वस्ती, अप्पा लोंढे यांची खोली ताथवडे, मुळगाव- छांगापूर ,जमलापुर तहसील, मनियाह, जि. जोनपुर, उत्तर प्रदेश) या आरोपी कडे देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. आरोपीस अटक करण्यात आली असून वंदू दत्तात्रय गिरे वय 45, पोलीस हवालदार, वाकड पोलीस स्टेशन यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे हे तपास करत आहेत.

तसेच मंगळवार 30 जून रोजी सनीज वर्ल्ड समोरील रोडवर, सुस, ता. मुळशी येथे आकाश दयानंद गायकवाड (वय 22, रा. सुसगाव, ता. मुळशी) या आरोपीकडे बिगर परवाना देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. बावधन पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. अरुण पांडुरंग नरळे पोलीस हवालदार, बावधन पोलीस ठाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बावधन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"