गोल्ड ट्रेडिंग मधून नफा देण्याचे अमिष;20 लाख 72 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : गोल्ड ट्रेडिंग मधून मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 20 लाख 72 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना केवळ येथे 2 ऑक्टोबर ते सहा डिसेंबर 2025 या कालावधीत घडली.
याप्रकरणी एका व्यक्तीने देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनन्या बंसल (रा. चंदिगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून एका ट्रेडिंग ॲपद्वारे सोन्याच्या व्यापारात मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमीष दाखविले. त्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण वीस लाख 72 हजार रुपये भरून घेतले. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली. देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक तपास करत आहेत.

जप्त फ्लॅटचे सील तोडून अनधिकृतपणे ताबा!
पिंपरी : बँकेचे कर्ज न फेडल्याने जप्त करण्यात आलेल्या फ्लॅटचे सील तोडून त्यावर अनधिकृतपणे ताबा मिळविल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी प्राधिकरण येथे 24 मार्च 2026 रोजी घडली आहे
याप्रकरणी बँक व्यवस्थापक देवेंद्र हरिदास कांबळे (वय 40, रा. कोंढवा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मीरा विलास परदेशी, मिलिंद विलास परदेशी आणि योगिनी विलास परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेचे कर्ज न फेडल्याने संबंधित फ्लॅट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी कटरच्या साह्याने फ्लॅटचे सील आणि कुलूप तोडले. तसेच फ्लॅटमध्ये अनाधिकृत प्रवेश करून त्यावर बेकायदेशीर ताबा मिळविला. रावेत पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

