Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

बावधन व बोपखेल येथे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱे तीन सराईत जेरबंद!

बावधन व बोपखेल येथे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱे तीन सराईत जेरबंद!

पिंपरी : अवैधरित्या दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवार 24 जून रोजी बावधन येथील मुंबई सर्विस रोडवर करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

आर्यन प्रकाश जाधव (वय 20 रा.रा.शिंदे यांच्या खोलीत,श्री. स्वामी समर्थ अपार्टमेंट पुणे, आणि ओमकार सचिन मोरे (वय 30, रा. रा. हमराज मित्र मंडळाजवळ,शास्त्रीनगर,कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र बंदी कायदा लागू असताना या शस्त्रसंधी आदेशाचे उल्लंघन करून दोन गावठी पिस्तुले व दोन जिवंत काडतुस असे जवळ बाळगले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. आरोपीकडून एक लाख 22 हजार रुपये किंमतीची शस्त्रे व काडतुसे जप्त करण्यात आली.पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन पिंपरी चिंचवड हे करत आहेत आरोपी ओंकार सचिन मोरे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चंदन नगर ,सिंहगड रोड ,कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोन पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार. पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दळे. नितीन ढोरजे .पोलीस हवालदार मोहम्मद गौस नदाफ. विक्रम कुदळे. प्रशांत सईद. रवी पवार ,सुखदेव गावडे यांनी केली

बोपखेल येथे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
बोपखेल येथे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बोपखेल येथील मुठा नदी लगतच्या मोकळ्या जागेत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार धोंडीराम बालाजी केंद्रे (वय 39) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .

यश उर्फ बबलू मारुती दिसले (वय 25 )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पोलीस आयुक्तांच्या घातक शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून एक देशी बनावटीचे पिस्तूल त्याचे मॅगझिन आणि एक जिवंत काडतुस बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगले. पोलिसांनी आरोपीकडून 54 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दापोडी पोलीस तपास करत आहे.
दोन गावठी पिस्तूल बाळगल्याने दोघे जेरबंद

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"