फक्त मुद्द्याचं!

14th June 2026
गुन्हेगारी

गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने ऑनलाइन 2 लाख रुपयांची फसवणूक!

गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने ऑनलाइन 2 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : मुंबई येथील घराचे गॅस कनेक्शनचे बिल भरणे बाकी असल्याचा व्हाट्सअप वर महानगर गॅस नावाची एपीके फाईल पाठवून 1 लाख 99 हजार 128 रुपयांचे क्रेडिट कार्ड मधून काढून आर्थिक फसवणूक केली. ही घटना दहा एप्रिल 2026 रोजी मौजे लोढा बेलमोंडो टॉवर 13/1502, गहुंजे ,ता. मावळ येथे घडली .

viara vcc
viara vcc

याप्रकरणी राजेंद्र नरहरी कोटणीस (वय 67, लोढा बेलमोंडो टॉवर, गहुंजे )यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संदीप कुमार गुप्ता (नाव पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ये घरी असताना त्यांच्या मोबाईलवर संदीप कुमार गुप्ता नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. आरोपीने फिर्यादीच्या मुंबई येथील घराचे गॅस कनेक्शनचे बिल भरणे बाकी असून ते भरले नाही तर कनेक्शन बंद करण्यात येईल असे सांगून व्हाट्सअप वर महानगर गॅस नावाची एपीके फाईल पाठवून त्यामध्ये आय सी आय सी आय क्रेडिट कार्डची सर्व माहिती भरण्यास सांगितले. फिर्यादीने माहिती भरून बिल भरण्याचा प्रयत्न केला असता बिल पेमेंट रिजेक्ट झाले. त्यानंतर आरोपीच्या क्रेडिट कार्ड मधून 1 लाख 99 हजार 128 रुपयांचे पेमेंट काढून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे. शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"