फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
देश विदेश

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्कर प्रमुख!

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्कर प्रमुख!

30 जुन रोजी कार्यभार संभाळणार
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची आर्मी प्रमुख म्हणून नियुक्तीचे आदेश काढले आहेत. 30 जून 2026 पासून ही नियुक्ती लागू केली जाईल. सध्याचे आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे याच दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर लष्कर प्रमुख म्हणून धीरज शेठ कार्यभार सांभाळतील.

viara vcc
viara vcc

लेफ्टनंट जनरल धीरज शेठ हे पुण्याच्या खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे (एनडीए)चे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 मध्ये त्यांना आर्मर्ड कोरमध्ये प्रमोशन देण्यात आले. सुमारे चार दशकांच्या विशिष्ट सैन्य कारकिर्दीत त्यांना ऑपरेशनल स्ट्रॅटेजीक, क्षमता विकास, आणि संस्थात्मक क्षेत्रामध्ये व्यापक अनुभव आहे. भारतीय सेनेची युद्ध क्षमता वाढवणे आणि दीर्घकालीन परिवर्तनात त्यांचा मोठा वाटा आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र कोरची कमांड केली .जी भारतीय सेनेची एक प्रमुख स्ट्राइक फॉर्मेशन आहे. त्यानंतर ते दिल्ली एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यरत होते .आर्मी कमांडर पदावर त्यांनी साउथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांड यांची कमांड केली आहे. ते हायर कमांड कोर्स आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे पदवीधर आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"