फक्त मुद्द्याचं!

5th June 2026
गुन्हेगारी

देहूरोड पोलिसांकडून अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक!

देहूरोड पोलिसांकडून अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक!

पिंपरी : देहूरोड मेन बाजार येथील गोयल निवास फ्लॅट नंबर दोन घराचा कडी कोंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील बावन ग्राम सोन्याचे व 2250 ग्रॅम वजना वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले .पोलिसांनी 24 तासात सराईत घरफोडी आरोपीला अटक करून सर्व चोरीला गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली .

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जून सायंकाळी साडेचार ते तीन जून सकाळी सहा यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील 52 ग्राम सोन्याचे व 2250 ग्रॅम चांदीचे दागिने चोरी केले. देहूरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. देहूरोड पोलीस स्टेशन मधील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करण्यात आली. दोन्ही तपास पथकाद्वारे घटनास्थळ व लगत परिसराचे सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता घटनास्थळावरून एक भगव्या रंगाची ऑटोरिक्षा मिळून आली .सदर ऑटो रिक्षाचा सीसीटीव्हीचे आधारे गुप्त बातमीदारामार्फत माग काढला असता देहूगाव या ठिकाणी ही रिक्षा गेल्याचे समजले. सदरची ऑटो रिक्षा ही वैकुंठ मंदिर या ठिकाणी उभी असल्याचे दिसल्याने तपास पथकाने सापळा लावून भगव्या रंगाची ऑटो रिक्षा (क्रमांक एम एच 14 जेपी ०२९५) मध्ये एक व्यक्ती येऊन बसला असता त्याला ताब्यात घेऊन त्याचा नाव व पत्ता विचारला.

आरोपीचे नाव विक्रम सिंग विठ्ठल सिंग ठाकूर (वय ३७, सध्या रा. मुक्तिधाम समोर शेट्टी यांची बिल्डिंग, देहूगाव) असे सांगितले .ऑटो रिक्षाची पाहणी केली असता ऑटो रिक्षामध्ये एक लोखंडी कटावणी मिळून आल्याने आरोपीकडे घरफोडी गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गोयल निवास फ्लॅट नंबर दोन येथील घरपोडी गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपी हा अट्टल घरफोडी करणारा चोरटा असून त्याच्यावर निगडी, भोसरी, चिखली, वाकड व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत .आरोपीकडे देहू रोड येथील गोयल निवास फ्लॅट मधील चोरीमध्ये चोरलेल्या सोने-चांदीच्या दागिन्याबाबत तपास केला असता त्याने घरफोडीतील सोने चांदीचे दागिने हे त्याचे राहते घरामध्ये ठेवले असल्याचे सांगितल. घरफोडी गुन्ह्यातील 100% सोने-चांदीचे दागिने आरोपीकडून जप्त करण्यात आले.

या गुन्ह्याचा तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, तपास पथकाचे अक्षय जाधव, पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वाव्हाळे, किरण खेडकर, पोलीस हवालदार बाळासाहेब विधाते ,प्रशांत माळी, केतन कानगुडे, पंकज भदाणे ,अमोल माने, शुभम बावनकर, मोमीन शेख या पथकाने केला

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"