फक्त मुद्द्याचं!

4th June 2026
गुन्हेगारी

अवैध गॅस रिफिलिंग धंद्यावर छापा; एक लाख किमतीच्या 81 गॅस टाक्या जप्त!

अवैध गॅस रिफिलिंग धंद्यावर छापा; एक लाख किमतीच्या 81 गॅस टाक्या जप्त!

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी
चाकण : खेड तालुक्यातील खराबवाडी, चाकण येथे जय गणेश भारत गॅस या दुकानांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगच्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख तीनशे रुपये किंमतीच्या 81 गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (2 मे) रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलिस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांना खराबवाडी चाकण- माहळुंगे रोड ता. खेड येथे जय गणेश भारत गॅस या दुकानांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. सचिन प्रकाश म्हस्करे (वय 31, रा. खराबवाडी, ता. खेड व एका अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आली.

घरगुती वापराचे भरलेल्या गॅस सिलेंडर मधून गॅस रिफिलिंग नोझलच्या साह्याने गॅस रिफिलिंग करण्यात येत होते. अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असताना देखील ज्वालाग्रही पदार्थ बाबत बंदोबस्त करण्याचे जाणीवपूर्वक टाळले. आरोपी विरुद्ध उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, विनोद वीर, गणेश सावंत, अमर कदम, गणेश हिंगे यांनी ही कारवाई केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"