गुन्ह्यात उघडकीस आणलेला 52 लाख 91 हजारचा मुद्देमाल मूळ मालकांना परत!

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची कामगिरी
पिंपरी : दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या मोटरसायकल चोरी, घरफोडी व अन्य घटनांच्या प्रकरणात विविध गुन्ह्यांचा छडा लावून 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. संबंधित चोरी झालेला माल न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकाला (फिर्यादी) परत करण्याचा कार्यक्रम पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्वेता खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या मोटरसायकली चोरीच्या , घरफोडीच्या घटना व इतर चोरीच्या घटनांच्या प्रकरणात दक्षिण महाळुंगे पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांनी चोरीसह विविध गुन्ह्यांचा छडा लावून 23 गुन्हे उघडकीस आणले. उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकली, सोन्याचे दागिने, मोबाईल, टेम्पो व रोख रक्कम असा एकूण 52 लाख 91 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकास (फिर्यादीस) परत करण्याचा कार्यक्रम शनिवार 16 मे रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या पोलिस उपायुक्त परिमंडळ श्रीमती श्वेता खेडकर यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.
या कामगिरी मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, पोलीस हवालदारअर्चना काळे, दत्तात्रय कुंभार, तसेच पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली .

