फक्त मुद्द्याचं!

24th April 2026
गुन्हेगारी

एमआयडीसी जागेच्या बनावट कागदपत्राद्वारे साडेसात कोटी रुपयांचा बँकेला गंडा!

एमआयडीसी जागेच्या बनावट कागदपत्राद्वारे साडेसात कोटी रुपयांचा बँकेला गंडा!

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मालकीचा भूखंड क्रमांक चार डी तीन ब्लॉक पिंपरी इंडस्ट्रियल एरिया मधील 1864 मीटर या मिळकतीची बनावट कागदपत्रे सादर करून सुवर्णयोग बँकेकडून सात कोटी पन्नास लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 जुलै 2014 ते आज पर्यंत स्वर्णयोग सहकारी बँक मर्यादित निगडी शाखा यांच्या कार्यालयात घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी शिरीन राऊफ शेख (वय 54, क्षेत्रीय व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय दोन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जोग सेंटर बिल्डिंग, पाचवा मजला, वाकडेवाडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ॲलेन अरुण बनसोडे (वय 47),सोनिया अरुण बनसोडे (वय 48),सोलोमन ऑलेन बनसोडे (वय 29),सेवारा बुरखानोबा (वय 35,सर्व राहणार बी 01, 403,एम्पायर इस्टेट, रांका ज्वेलर्स बिल्डिंग ,चिंचवड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे मेस्कॉर्प कंपनीचे तात्कालीन संचालक (एक ते चार )व त्यांचे इतर साथीदार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचा भूखंड क्रमांक चार डी तीन ब्लॉक पिंपरी इंडस्ट्रियल एरिया, मुंबई पुणे रोड, चिंचवड, पुणे येथील क्षेत्र 1864 मीटर या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून गणेश व्हिजन आकुर्डी येथील सुवर्णयुग सहकारी मर्यादित बँकेकडून सात कोटी पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्याचा बोजा नोंद करण्यासाठी एमआयडीसीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून सुवर्णयुग सहकारी बँक निगडी शाखा या बँकेत सादर करुन फसवणूक केली. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आ .गु. शा. कलगुटके तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"