फक्त मुद्द्याचं!

19th April 2026
गुन्हेगारी

मेफेड्रोन अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या संघटित टोळीवर मोक्का!

मेफेड्रोन अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या संघटित टोळीवर मोक्का!

पिंपरी : मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी गुन्हेगारांवर केलेली ही पहिली मोठी कारवाई आहे.

viara vcc
viara vcc

मेहबूब कबुद्दीन करपुडे उर्फ मुसा खान (रा. हांडेवाडी, पुणे), प्रतीक सचिन सपकाळ रा. खडकी, अमीन फिरोज खान (रा घोरपडी पेठ, पुणे), रफिक अबूबखर मेमन (रा. भाग्योदय नगर ,पुणे), वसीम इसाक बेग (रा. परांडा, जि. धाराशिव) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. सांगवी येथील बा .रा. घोलप महाविद्यालयाजवळ १२ डिसेंबर 2025 रोजी दोन जण अमली पदार्थांची विक्री करताना रंगेहात पकडले गेले होते. त्यांच्याकडे 55 ग्रॅम, 21 मिलिग्रॅम ‘एमडी’ हा अमली पदार्थ मिळून आला होता. तपासा दरम्यान आरोपी संघटित टोळीच्या माध्यमातून हा व्यवसाय करत होते .

पोलिसांनी या कारवाईत पन्नास ग्रॅम एमडी ड्रग्स, मोबाईल फोन, आणि एक चार चाकी वाहन असा आठ लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. टोळी प्रमुख मेहबूब याने इतर साथीदारांसह पिंपरी चिंचवड व पुण्यात अमली पदार्थाच्या अवैध धंद्यासंबंधी गुन्हे केलेले आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी या टोळीवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी मंजुरी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील ,सहाय्यक निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"