फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
गुन्हेगारी

ट्रेडिंगमध्ये चांगला नफा; अमीष दाखवून 25 लाख 30 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक!

ट्रेडिंगमध्ये चांगला नफा; अमीष दाखवून 25 लाख 30 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक!

पिंपरी : एचडीएफसी बँक सेक्युरिटी ब्रोकर अकाउंट अशी जाहिरात व्हाट्सअप वरून करून ब्लॉक ट्रेडिंग मध्ये चांगला नफा मिळेल असे विश्वासाने सांगितल्यावर ऑनलाईन 25 लाख 30 हजार रुपये गुंतवले. मात्र फिर्यादीने शेअर्स वाटप किंवा त्याचा परतावा न देता फसवणूक केली. ही घटना 26 जानेवारी ते 6 मार्च 2026 या कालावधीत सोमाटणे, ता. मावळ, येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी एका व्यक्तीने अज्ञात व्यक्ती विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मोबाईल मधून इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲप वरती व्हिडिओ बघत असताना ब्लॉक ट्रेडिंग संबंधित एचडीएफसी सिक्युरिटीज ऍडव्हान्स ब्रोकर अकाउंट अशी जाहिरात बघितली. त्यानंतर एचडीएफसी सिक्युरिटीज ऍडव्हान्स ब्रोकर अकाउंट या ब्लॉक ट्रेडिंगच्या अकाउंटला जॉईन करून त्याच दिवशी (C- 122), एचडीएफसी सिक्युरिटीज या व्हाट्सअप ग्रुपला मोबाईल नंबर वरून ॲड करून फिर्यादीस त्यांचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केले.

अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप वरून एचडीएफसी सेक्युरिटीचे प्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख करून दिली. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीस एचडीएफसी सिक्युरिटी लिमिटेड कंपनी मध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितल्यामुळे फिर्यादीने विश्वासाने 25 लाख तीस हजार रुपये ट्रेडिंग मध्ये गुंतवले. परंतु अज्ञात व्यक्तीने फिर्यादीस शेअर वाटप केले नाही, किंवा त्याचा परतावा देखील दिला नाही. सदर अज्ञात व्यक्तीने एचडीएफसी सेक्युरिटीचा प्रतिनिधी या नावाचा वापर करून फिर्यादीची पंचवीस लाख तीस हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे कांबळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"