फक्त मुद्द्याचं!

7th April 2026
गुन्हेगारी

टेम्पो ट्रकची पाठीमागून जोरात धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू!

टेम्पो ट्रकची पाठीमागून जोरात धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू!

पिंपरी : हिरो होंडा दुचाकी स्वराला टेम्पो ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार सहा एप्रिल रोजी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बर्ड व्हॅली गार्डन समोर चिंचवड येथे घडली. सुभाष बन्सी ओहोळ (वय 42) असे मयत दुचाकीस्वराचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी अजय सुभाष ओहोळ (वय 23, रा.साई कॉलनी, हिरा हाइट्स, फ्लॅट नंबर 103, साने चौक, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संतोष सुभाष दळगडे (वय 45, टाॅवर लाईन, तुळजाभवानी मंदिराजवळ चिखली, पुणे, मूळ गाव- रा इंदिरा चौक, उमरगा ,उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडील सुभाष बन्सी ओहोळ (वय 42) हे हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर (एम एच 14, डी जी /72 64) घेऊन थरमॅक्स चौकातून ते बर्ड व्हॅली चौकाकडे रस्त्यावरून जात असताना बर्ड व्हॅली गार्डन समोर त्यांचे पाठीमागून येणारा टेम्पो टेम्पो ट्रक नंबर (एम एच, 0 4, एफ यु /66 55) वरील चालक आरोपीने त्यांच्या ताब्यातील टेम्पो ट्रक हा वेगात पाठीमागे घेऊन फिर्यादीचे वडील चालवत असलेल्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यांच्या अंगावरून टेम्पो ट्रक गेल्याने डोक्यास, कपाळास, हातापायास, जबर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत झाला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"