फक्त मुद्द्याचं!

7th April 2026
गुन्हेगारी

आळंदी येथील दुहेरी हत्याकांड कौटुंबिक कलहातून; आरोपी जेरबंद!

आळंदी येथील दुहेरी हत्याकांड कौटुंबिक कलहातून; आरोपी जेरबंद!

गुन्हे शाखा युनिट तीन कडून कारवाई
पिंपरी : कौटुंबिक कलहातून दुहेरी हत्याकांडात दोन निष्पाप जीवांचा खून करून फरार झालेल्या आरोपीस गन्हे शाखा युनिट तीन च्या पोलिसांनी पुणे नाशिक रोड, आळेफाटा येथून अटक केली अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनायक तुकाराम भवारी (वय 31, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर मूळ गाव- रा. तेजुर, ता. जुन्नर, जि. पुणे) यास अटक करण्यात आली आहे .गुरुवार 2 एप्रिल रोजी हनुमान वाडी ठाकर वस्ती केळगाव आळंदी येथे कु. धनश्री सोनू केदारी (वय 6) आणि मंगल चंद्रकांत शिंदे (वय 70 )यांचा खून झाला. याबाबत फिर्यादी श्रीमती संगीता दत्तात्रय केदारी यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी या इंद्रायणी हॉस्पिटल आळंदी येथे साफसफाईचे काम करत असतात. त्यांना दोन एप्रिल रोजी रात्रपाळीचे काम असल्याने त्यांनी त्यांची नात कु. धनश्री यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मावशी मंगल शिंदे यांच्याकडे सोडून गेल्या होत्या. नातीला त्या मावशीच संभाळत असत.

एक एप्रिल रोजी रात्री आठ ते दोन एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान त्या कामावर गेल्या होत्या. त्यामुळे राहत्या घरी फिर्यादीची नात आणि मावशी या दोघीच होत्या. रात्रपाळीची ड्युटी संपवून फिर्यादी घरी आले असता घरामध्ये त्यांच्या नातीला आणि मावशीला अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारले होते. या प्रकरणी फिर्यादी यांनी विनायक भवारी यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे ,पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलिसअंमलदार सोनवणे, बोऱ्हाडे, भोसुरे, सूर्यवंशी, भांगले, राळे, दांगट, महाले, थोरात, वराडे असे पथक तपासासाठी तैनात केले होते.

आरोपीचा शोध घेत असताना त्यांना तांत्रिक विश्लेषणाचेद्वारे व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील गुन्हा करणारा व्यक्ती आळेफाटा परिसरामध्ये आहे. सदरच्या पथकाने आळेफाटा येथे जाऊन हॉटेल समाधान जवळ आरोपी विनायक भवारी यास अटक केली आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता सदरची घटना कौटुंबिक कलहातून केली असल्याचे त्याने तपासात कबूल केले. पुढील तपास आळंदी पोलीस ठाणे करत आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"