फक्त मुद्द्याचं!

10th April 2026
पुणे

पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्तपदी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती!

पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्तपदी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती!

पुणे : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), नागपूर येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची पीएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

मंजुलक्ष्मी यांच्या कोल्हापूर येथील जागी डॉ. राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या सध्याच्या पदाचा कार्यभार तत्काळ सुपूर्द करून नवीन पदावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.

या बदलामुळे पीएमआरडीएचे आयुक्त डॅा. योगेश म्हसे यांच्या पाठोपाठ अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची बदती करण्यात आली आहे. यामुळे पीएमआरडीएच्या महत्वाच्या विकास कामांवर याचा परीणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"