फक्त मुद्द्याचं!

3rd April 2026
गुन्हेगारी

मजुर मृत्यू प्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल!

मजुर मृत्यू प्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल!

पिंपरी: बांधकाम ठेकेदाराने इमारतीचे बांधकाम करताना कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवल्याने पहिल्या मजल्यावर काम करत असताना बांधकाम कामगार खाली पडून गंभीर जखमी झाला. उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना 22 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आळंदी भाजी मार्केटमधील सव्र्हे क्रमांक एक अ/ 23 आळंदी ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी कुमार कोंडीबा गिरीगोसावी (पोलीस उपनिरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे, रा. सेक्टर नंबर 27, निगडी प्राधिकरण) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वैभव कस्पटे (रा. आळंदी ता. खेड )असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम ठेकेदारचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंळदी भाजी मार्केट मध्ये नवीन इमारतीचे बांधकाम चालू असताना पहिल्या मजल्याचे आडवे बीमचे लाकडी फळ्या मारण्याचे काम सुरू असताना मजूर सुभाष प्रल्हाद हरीकर (वय 27) हा वरून खाली पडला. त्याच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे 29 मार्च रोजी निधन झाले .यास बांधकाम ठेकेदार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ठेकेदाराने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था न केल्याने ही घटना घडली. आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"