एमडी अमली पदार्थ बाळगणारे हिंजवडी पोलिस गुन्हे शाखेच्या जाळ्यात;दोघे जेरबंद

पिंपरी : अमली पदार्थ एमडी विक्रीकरिता चार चाकी गाडीतून विनोदी वस्ती वाकड येथे येणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाल्यानंतर हिंजवडी गुन्हे शोधपथकाने सापळा लावून अल्हाट वस्ती जाणाऱ्या रस्त्यावर आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडे चार लाख वीस हजार रुपये किमतीचा बेचाळीस ग्रॅम वजनाचा एमडी पोलिसांनी जप्त केला .आरोपीच्या साथीदारास पोलिसांनी (गोवंडी ,मुंबई )येथून अटक केली त्याच्याकडे वीस लाख रुपये किमतीचा 200 ग्रॅम एमडी ताब्यात घेण्यात आला अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, सहाय्यक पोलीस फौजदार नरेश बलसाने, पोलिस,अंमलदार कारभारी पालवे ,ओम प्रकाश कांबळे व अरुण पारधी हे हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस फौजदार नरेश बलसाने यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एक व्यक्ती अमली पदार्थ एमडी विक्री करिता चार चाकी गाडीतून विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. त्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संमतीने कारवाई करण्याचे आदेश मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने सापळा लावून विनोदी वस्ती अल्हाट वस्ती कडे जाणाऱ्या रोड जवळ आरोपी अतुल शंकर बालगुडे (वय 35, राहणार पाथरगाव, ता. मावळ ,जिल्हा. पुणे) यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेला चार लाख वीस हजार रुपये किमतीचा 42 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ आणि तीन लाख 24 हजार दोनशे रुपये किमतीची चार चाकी व इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
आरोपी बालगुडे यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला असता त्याने शाहरुख उर्फ सद्दाम इकबाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई )यांच्याकडून एमडी अमली पदार्थ आणल्याचे सांगितले त्यानुसार त्याच्या साथीदाराला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले . आरोपी अन्सारी यांच्याकडे वीस लाख रुपये किमतीचा 200 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ मिळून आला. या दाखल गुन्ह्यांमध्ये एकूण 27 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे करीत आहेत. ही कारवाई हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक( गुन्हे) बालाजी पांढरे ,ऋषिकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे ,पोलिस अंमलदार नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले, संदीप मासाळ, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अरुण पारधी यांच्या पथकाने केली.

