फक्त मुद्द्याचं!

1st April 2026
गुन्हेगारी

पिंपरीत मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात बनावट मालाची विक्री ; आठ दुकानदारांवर कारवाई!

पिंपरीत मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात बनावट मालाची विक्री ; आठ दुकानदारांवर कारवाई!

पिंपरी: मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात बनावट मालाची विक्री करणाऱ्या आठ दुकानदारांवर कारवाई करून 13 लाख 48 हजार रुपये किमतीच्या माल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार 29 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पहिला व दुसरा मजला डीलक्स मॉल, पिंपरी येथे करण्यात आली .

viara vcc
viara vcc

याबाबत विनोद बिजल सुमरा (वय 49, रा. 201, दुसरा मजला रश्मी बिल्डिंग, डहाणूकरवाडी, गोखले रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई )यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सावळाराम सुजाराम चौधरी (वय 28, रा. फ्लॅट नंबर 3, डी वार्ड साई चौकाजवळ, पिंपरी ),चेपाराम बाबुराम चौधरी (वय 29, रा. फ्लॅट नंबर 504, डी वार्ड शरयू निलय सोसायटी, भुवनेश्वर मंदिराजवळ, पिंपरी), हरीश फयाजी माली (वय 34,आशोक थिएटर जवळ, पिंपरी), प्रवीण बद्रीसिंग राजपुरोहित (वय 30, फ्लॅट नंबर 204, डॉल्फिन विस्टा सोसायटी, पवनानगर, चिंचवड), भरत आसाराम प्रजापति (वय 23, अशोक थिएटर जवळ, पिंपरी), मुकेश लालाराम चौधरी (वय 30, रा. शिवाजी पार्क सोसायटी, नढे नगर काळेवाडी), खेसाराम देवाराम प्रजापति (वय 38, रा. कुंभारवाडा, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, पिंपरी), रतनसिंग गिसूसिंग राजपुरोहित रा.सी 3, फ्लॅट नंबर 402, एम्पायर इस्टेट ,रांका ज्वेलर्स जवळ चिंचवड) या आरोपींविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते आठ यांनी त्यांच्या मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात झेओमी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ( xiaomi technology private limited) कंपनीचे स्वामित्व असलेल्या त्याच नावाचे व चिन्हाचे बनावट डिस्प्ले, मोबाईल कव्हर ,चार्जर कोणतीही परवानगी न घेता विक्री करीत असताना आढळून आले. कंपनीचा माल बनावट पद्धतीने तयार करून विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्याने फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे. वरील आरोपी हे मोबाईल ॲक्सेसरीज दुकानदार आहेत. पिंपरी मध्ये बनावट वस्तूंची नेहमीच विक्री केली जाते असा संशय होता. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दलालवाड हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"