जमीन खरेदी करण्यासाठी दिलेल्या तीन लाख 38 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी :जमीन खरेदी करण्यासाठी दिलेले तीन लाख 38 हजार रुपये रोख व बँक चेक द्वारे दिले .मात्र जमिनीचे खरेदीखत करून न देता फसवणूक केली .ही घटना 27 जानेवारी 2019 ते 2020 पर्यंत गोडाऊन चौक, सर्वे नंबर 91/1, येथील प्लॉट नंबर 58 , वडमुखवाडी येथे घडली.

याप्रकरणी मदिना अहमद शेख (वय 37, रा. स्वतःचे घर, खालची मज्जित जवळ, सादिया चिकन सेंटर जवळ, बालाजी नगर पिंपरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अजहर सिकंदर खान (वय 52, राधानगरी हाउसिंग सोसायटी सी ए -2, दिघी रोड ,भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी जमीन खरेदीसाठी आरोपीस टोकन म्हणून 20000 रुपये रोख व त्यानंतर वेळोवेळी असे मिळून तीन लाख 38 हजार रुपये रोख व बँक धनादेशाद्वारे दिले. आरोपीने बनावट कुलमुखत्यार पत्र बनवून त्यावर फिर्यादी व फिर्यादी सोबत इतर लोकांच्या सह्या घेतल्या. वेळोवेळी काही ना काही कारण सांगून खरेदीखत करून देतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला करून आर्थिक फसवणूक केली. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुसळे तपास करत आहेत.

