फक्त मुद्द्याचं!

29th March 2026
गुन्हेगारी

लिफ्टचा रोप तुटल्याने एकाचा मृत्यू ; हाउसिंग सोसायटी पदाधिकार्‍यांवर गुन्हा!

लिफ्टचा रोप तुटल्याने एकाचा मृत्यू ; हाउसिंग सोसायटी पदाधिकार्‍यांवर गुन्हा!

पिंपरी: तळेगाव दाभाडे येथील निसर्ग हाउसिंग सोसायटी मधील लिफ्टचा रोप तुटल्याने लिफ्ट मध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. यास सोसायटी पदाधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सहा डिसेंबर 2025 रोजी तळेगाव दाभाडे येथील निसर्ग हाउसिंग सोसायटी ता. मावळ येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी रितेश रामा सुरंगे (वय 32, फ्लॅट नंबर 704 ,रॉयल ब्लीस सोसायटी, अन्नपूर्णा केटर्स दत्तनगर, किवळे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निसर्ग हाउसिंग सोसायटी बी विंगचे चेअरमन पुंडलिक हिंदुराव बारकेवय (वय 44), दीपक अशोक हेंद्रे, विनायक बाबुराव खोराटे, निलेश बाळू गवळी, प्रवीण श्रीवास, सचिन बापू शिर्के, सौ प्रांजली सर्वेश पिंगळे, सौ धनश्री योगेश वैद्य, सौ वैशाली जितेंद्र बोरकर, रामभाऊ किसन साबळे, संतोष साधू असवले (सर्व राहणार निसर्ग हाउसिंग सोसायटी) अशी गुन्आहा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ दिनेश सुरंगे हा राहत्या पत्त्यावरून कामावर जायला निघाला असता तो लिफ्टने खाली जात असताना सहाव्या व सातव्या मजल्याच्या मध्ये लिफ्ट अडकली .त्यास बाहेर काढत असताना लिफ्टचा रोप तुटल्याने लिफ्ट खाली कोसळली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्यास अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .त्याचे मृत्यू निसर्ग बी विंग सहकारी गृहरचना संस्था यांचे सभासद मंडळ चेअरमन आरोपी नंबर 1 ते 11 हे जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक खामगळ हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"