भाडेकराराची माहिती न दिल्याने गुन्हा दाखल!

पिंपरी : बांगलादेशी घुसखोर व्यक्तीला भाड्याची खोली देऊन भाडेकराराची माहिती पोलीस स्टेशनला न दिल्याने एका व्यक्तीविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना 11 मार्च 2026 रोजी श्रीकांत बबन बोत्रे (वय 36, गट नंबर 119, खालुम्ब्रे ,हुंडाई कंपनी रोड, ता. खेड) येथे घडली.

याप्रकरणी पुंडलिक नरसिंह पाटील पोलीस शिपाई, दहशतवाद विरोधी शाखा यांनी तक्रार दाखल केली आहे. श्रीकांत बबन बोत्रे (वय 36 रा गट नंबर 119 खालुम्ब्रे ते हुंडाई कंपनी रोड खालुम्ब्रे तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याने आरोपीस भाडेकराराची माहिती देण्याचा आदेश 13 फेब्रुवारी 2026 रोजी दिला होता. एक महिन्याच्या मुदतीत ही माहिती पोलीस स्टेशनला देणे गरजेचे असताना देखील जाणीवपूर्वक भाडेकरूची माहिती देण्यास टाळाटाळ केली. आरोपीच्या घरात बांगलादेशी घुसखोर व्यक्ती मेखाईरुल इस्लाम (वय 37) हा बेकायदेशीर रित्या वास्तव्यास असल्याचे मिळून आले. त्यांनी पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे वैध आदेशाचा भंग केला म्हणून आरोपी श्रीकांत बबन बोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार कारोटे हे तपास करीत आहेत.

