पिंपरी येथील “रीच फील स्पा” सेंटरवर पोलिसांचा छापा; तीन पीडित महिलांची सुटका!

पिंपरी : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सम्राट चौक, पिंपरी येथील “रिच फील स्पा” (Rich Feel Spa) सेंटरवर छापा टाकून वेश्या गमनासाठी वापर करण्यात येणाऱ्या तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी स्पा सेंटर मॅनेजरला अटक करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे

सम्राट चौक पिंपरी येथील “रिच फील स्पा” येथे स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या स्पा सेंटरवर छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी स्पा चालक मयूर दिनेश मोहिते (वय 26, रा. दिघी), स्पा मॅनेजर अक्षय महादेव सुतार (वय 26, सध्या रा. काळभोर पाटील कॉलनी, साईनाथ नगर, निगडी, मूळ- रा दुर्गेवाडी वसाहत, कोंडोलीगाव, ता.पन्हाळा जि. कोल्हापूर) यांच्या विरूद्ध संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्पा मॅनेजर अक्षय महादेव सुतार यास पोलिसांनी अटक केली आहे.
मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अवैध व्यवसाय करणाऱ्या एकूण आठ आस्थापनावर मागील तीन महिन्यात छापे टाकून भारतीय न्याय संहिता सह पिटा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यात एकूण सहा मसाज पार्लर स्पा ,दोन हॉटेल वर कारवाई करण्यात आलेली आहे. आठ गुन्ह्यांमध्ये एकूण वीस आरोपींना अटक करण्यात आली असून सतरा पीडित महिलांची सुटका केली आहे असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मागील तीन वर्षाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणांचे परिसरात मसाज स्पा, हॉटेल लॉज व रहिवासी ठिकाणांचे आडून अवैधरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण 29 आस्थापना एक वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्यात बाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्राथमिक चौकशी अंतिम बंदीचे आदेश दिले आहेत. सन 2026 मध्ये तीन अस्थापना एक वर्षा कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश पारित केले आहेत. यापुढेही अशा प्रकारांवर धडक कारवाई भविष्यात केली जाईल असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे (गुन्हे एक) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली शेंडगे, अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार सुनील शिरसाट, पोलीस हवालदार भगवंता मुठे, गणेश कारोटे, श्रद्धा भरगुडे, वैष्णवी गावडे, नीलम बुचुडे ,संगीता जाधव, उदयकुमार भोसले यांच्या पथकाने केली आहे.

