फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
गुन्हेगारी

क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगून 69 लाख रुपयांची फसवणूक!

क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगून 69 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी: मनी लॉन्ड्रीगची केस दाखल असून त्याचा तपास आपण करत आहोत असे भासवून क्राईम बॅच अधिकारी असल्याचे सांगून तोतयागिरी करून व या केस मध्ये अटक करण्याची भीती घालून फिर्यादी कडून जबरदस्तीने 69 लाख रुपये रक्कम ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडून फसवणूक केली. ही घटना 13 फेब्रुवारी 2026 ते 17 मार्च 2026 या कालावधीत हेमंत बंगला, सातपुडा हाउसिंग सोसायटी, कावेरी या ज्वेलर्स समोर जुनी सांगवी येथे घडली.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

याप्रकरणी एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.ट्रायडिपार्टमेंट अनोळखी व्यक्ती, सुबोधराव असे नाव सांगणारा अज्ञात व्यक्ती, (खरे नाव व पत्ता माहीत नाही) वरील बँक अकाउंट खातेदार यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपींनी फिर्यादीची ट्रायडिपारमेंट मधून बोलत आहे असे सांगून फिर्यादीच्या आधार कार्ड नंबर वर सिम कार्ड काढून त्या नंबर वरून अश्लील फोटो व्हिडिओ व मेसेज पाठवल्यामुळे खूप लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत अशी धमकी फिर्यादीला दिली. फिर्यादीवर मनीलॉन्ड्रीग केस दाखल असून त्याचा तपास आरोपी करत आहे असे सांगून आणि क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून या केस मध्ये अटक करण्याची भीती घातली. फिर्यादी कडून जबरदस्तीने व अ प्रामाणिकपणे 69 लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यास भाग पाडून फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे नांदेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"