बांधकाम व्यवसायिकाची 2 कोटी 94 लाखाची फसवणूक!

पिंपरी : जांबे येथील जमीन विकसन करारनामा करून विकसन केल्यानंतर एग्रीमेंट करण्यास टाळाटाळ करून एका बांधकाम व्यवसायिकाची दोन कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना एक मे 2023 ते आज पर्यंत घडली आहे.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर पांडुरंग वरेकर (वय 51, रा. पुनावळे, लिगशी आयवे इ 202, गायकवाड नगर, पुनावळे ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अरुण विलास गायकवाड, विलास गायकवाड, विकी विलास गायकवाड, अरुण गायकवाड यांची पत्नी (नाव माहित नाही) (सर्व रा. घर नंबर 31, जनवाडी, जनता वसाहत गोखलेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांची जांबे येथील सर्वे नंबर 115/2/1 मध्ये 3.25 आर जागा फिर्यादी यांना विकसनासाठी देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने जागा विकसन केल्यानंतर आरोपींनी एग्रीमेंट करण्यास टाळाटाळ केली. 15 मे 2025 रोजी आरोपी यांनी संगणमत करून जांबे येथील बांधकाम साईट ही विकसनासाठी फिर्यादीकडे असताना त्या ठिकाणी अनधिकृत पणे येऊन दमदाटी व दादागिरी करून आठ फ्लॅटचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतले. तसेच बिल्डिंग मधील सीसीटीव्ही कॅमेरे, स्लाइडिंग विंडो दगड मारून फोडून नुकसान केले. लाईट मीटरच्या वायर तोडल्या, बोरवेल मध्ये विटा दगड टाकून बोरवेल बंद केले. इलेक्ट्रिक वायर मटेरियल सोबत घेऊन जाऊन अंदाजे 40 लाख रुपये इतके नुकसान केले, व दोन कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सावंत हे तपास करत आहेत

