पिंपळे सौदागर राष्ट्रवादी कॉंग्रेस लकी ड्रॉ द्वारे सचिन ढेपे यांना नवी कोरी बुलेट!

पिंपरी : महानगरपालिका निवडणुकीत पॅनेल साठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन म्हणून पिंपळे सौदागर येथील हॉटेल व्यावसायिक व नाना काटे यांचे खंदे समर्थक संतोष मल्हारी काटे उर्फ महाराज यांनी एक नवीन बुलेट दुचाकी बक्षीस ठेवलेली होती लकी ड्रॉ मध्ये प्रभागातील सचिन ढेपे यांनी ही नवी कोरी बुलेट गाडी जिंकली. नाना काटे मित्र परिवाराच्या हस्ते सचिन ढेपे यांचा सन्मान करून गाडीची चावी देण्यात आली.

पिंपळे सौदागर प्रभाग क्र.२८ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पॅनेल प्रमुख मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पॅनेल साठी पिंपळे सौदागर प्रभागातील सुमारे तीनशे सक्रीय कार्यकर्त्यापैकी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाना काटे मित्र परिवाराच्या वतीने लकी ड्रॉ द्वारे एका कार्यकर्त्याचे नाव काढण्यात आले.या लकी ड्रॉ मध्ये प्रभागातील सचिन ढेपे यांनी ही नवी कोरी बुलेट गाडी जिंकली. नाना काटे मित्र परिवाराच्या हस्ते सचिन ढेपे यांचा सन्मान करून गाडीची चावी देण्यात आली.

