जादा परतावा देण्याचे आमीष; 15 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी: एका व्यक्तीने त्याच्या हॉबीज टॉप (Hobizztop) या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून फिर्यादी यांची 15 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 24 जुलै 2021 ते आज पर्यंत एफ. सी. कॅन्टीन, लंच अँड स्नॅक सेंटर, भोसरी येथे घडली.
या प्रकरणी नितीन मनोहर सुपेकर (वय 57, रा. शॉप नंबर एक, पंचरत्न अपार्टमेंट, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल लक्ष्मण शिंदे (रा. गट नंबर २४६ ,तारापार्क, माळवाडी रोड, आव्हाळवाडी, वाघोली ,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांना हॉबीज टॉप कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमीष दाखविले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी आणि अन्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या रकमेचा कोणताही परतावा तसेच मूळ मुद्दल परत न करता त्यांची 15 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे हे अधिक तपास करत आहेत.

आंबेठाण चाकण मध्ये विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री!
चाकण: साई हॉटेल अँड चायनीज सेंटर आंबेठाण चाकण मध्ये विनापरवाना सतरा हजार पाचशे रुपये किमतीची देशी-विदेशी दारूचा प्रोहिबिशनचा माल विक्री करता बाळगला.पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली. मंगळवार 17 मार्च रोजी रात्री साडे सहाच्या सुमारास साई हॉटेल अँड चायनीज सेंटर पत्रा शेड आंबेठाण चौक चाकण येथे कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी निखिल बाळासाहेब वर्पे (वय 33, पोलीस शिपाई ,अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड )यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कृष्ण बहादुर सिंग (वय 27, रा. साई हॉटेल अँड चायनीज सेंटर ,आंबेठाण, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साई हॉटेल अँड चायनीज सेंटर मध्ये बेकायदेशीर रित्या देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 17 हजार पाचशे रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूचा प्रोविबिशनचा माल सापडला. आरोपी या दारूची विक्री हॉटेलमध्ये बेकायदेशीर करीत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गवारी हे पुढील तपास करत आहेत.

