फक्त मुद्द्याचं!

17th March 2026
गुन्हेगारी

ब्ल्यू बिल्स स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; एकास अटक

ब्ल्यू बिल्स स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; एकास अटक

पिंपरी : भक्ती शक्ती चौक, निगडी येथील ब्ल्यू बिल्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांना व एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवार 16 मार्च रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शॉप नंबर 32 व्हिजन प्लस मॉल, भक्ती शक्ती चौक, निगडी येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी भगवंता चिंतू मुठे पोलीस हवालदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अमोल खंडू जाधव (वय 40 ,सध्या रा. शॉप नंबर 32, व्हिजन प्लस मॉल ,भक्ती शक्ती चौक, निगड असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने ब्लू बिल्स स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पिडीत महिलांना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी छापा टाकून महिलांना मुक्त केले. यावेळी दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडे मिळून आला. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख हे पुढील तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"