फक्त मुद्द्याचं!

16th March 2026
गुन्हेगारी

1 लाख 25 हजार रुपये किंमतीचा तंबाखूजन्य गुटखा जप्त; एकास अटक

1 लाख 25 हजार रुपये किंमतीचा तंबाखूजन्य गुटखा जप्त; एकास अटक

तळेगाव: आदेशाचे उल्लंघन करून एक लाख 25 हजार तीनशे नव्वद रुपये किंमतीचा तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारी विक्री करता जवळ बाळगल्याने पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीस अटक केली. ही कारवाई शनिवार 14 मार्च रोजी पावणेतीन च्या सुमारास मस्करणीस कॉलनी तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी प्रतीक संभाजी कवडे पोलीस शिपाई ,अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. निहार गोपाल विश्वास (वय 53, प्रियंका जनरल स्टोअर, रा. तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नसुरक्षा आयुक्त महाराष्ट्र यांच्या आदेशाप्रमाणे वीस जुलै 2025 पासून पुढील एक वर्षासाठी तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारी यांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरी देखील आरोपीने एक लाख 25 हजार तीनशे नव्वद रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधी तंबाखू व पान मसाला विक्रीसाठी दुकानात ठेवला होता. पोलिसांनी एक मोबाईल, एक दुचाकी मोपेड गाडी आणि गुटखा जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"